अविस्मरणीय आठवणी
©Komal Owhal
सहजच बसले होते,थोडा मोकळा वेळ मिळाला होता,म्हणून ठरवले एखादे पुस्तक वाचू पण तितक्यात एक album डोळ्यासमोर दिसला,एक क्षणातच जुन्या आठवणी अवतीभवती भासू लागल्या,सर्व गोड आठवण म्हणजे शाळा।
हो ना??
हे बालपण किती निरागस असते ना,काहीही कसलीही काळजी न करता जगलेले जीवन।
शाळेचं नाव काढले की प्रत्येकाचेच डोळयात आनंदाश्रू येतात,खर ना..
वयाच्या चौथ्या वर्षापासून आई जबरदस्ती ने शाळेत घेऊन जायची,सुरुवातीला इतके नखरे असायचे,
"आई,मी नाही ना ग जाणार शाळेत" , "आई,पोटात दुखतंय"
पण आईला मात्र शाळेत न जाण्याची कारणं कळायचीच,ओरडून नाही ऐकले तर धपाटे घालून शाळेत तर पाठवायचीच..
मग हळू हळू आपल्याला पण सवय होतेच,मित्रमैत्रिणी झाल्या खेळ घेतले जायचे वर्गात,सर्वांचा आवडता विषय म्हणजे चित्रकला,मग चित्र नाही आले काढायला तरी चालेल,आयुष्यात ओरत्येक जण ते डोंगराचाच चित्र पहिल काढतो,डोंगर त्यावर सूर्य एक झाड आणि पक्षी,काय मग आले ना ते दिवस डोळ्यासमोर??
मग Gathering व्हायचे,वेशभूषा स्पर्धा आणि खूप काही..
आमच्या वेळी प्ले ग्रुप वगैरे नव्हते.शिशुवर्ग,बालवर्ग,पहिली दुसरी ते दहावी.
2 -3 तासांचे वर्ग असायचे,आमच्या आई पण घरी नव्हत्या जात एकही सुटेपर्यंत तिथेच एकमेकींशी गप्पा मारत बसायच्या.."कस जाणार आम्हा Mचिंमुकल्या जीवाला सोडून म्हणा,आईच शेवटी,काळजी असणारच"
आमच्या शाळेच्या आवारात एक भेळ बनवणारे काका होते,आमच्या आई ना कधी भेळ तर कधी शेंगदाणे,कधी मुरमुरे अस काहीबाही घेऊन ठेवायचे आम्हाला..
जशी बेल वाजली रे वाजली तस बॅग घेतले की पळत सुटायचो आम्ही..
"किती गोड त्या आठवणी"
वर्ग कोणताही असो आम्ही अभ्यासामुळे धपाटे खायचोच,किती ही चांगले मार्क्स मिळाले तरी प्रसाद हा मिळायचाच,"गोड नाही हा,धपाट्यांचा"
"सर्व पालकांना वाटते ना,आपले मूल पुढं जावं म्हणून ते अभ्यासाला महत्व द्यायचे,कारण फक्त एक आपले मूल कधी मागे राहू नये"
शाळेत अभ्यासाचा जितका कंटाळा यायचा ना तितकाच शाळेत जायला उत्साह सुद्धा असायचा..
शेवटी "अ पासुन ते अ: पर्यंत आणि क पासून ज्ञ पर्यंत चा प्रवास म्हणजे शाळा"
शाळेतले मित्र मैत्रिणींसोबतच्या गप्पा,तास सुरू असतानाच काहीही चटरपटर शिक्षकांच्या नजर चुकवून खाणे..पेन्सिल किंवा पेन ची फाईट,फुली गोळा,अक्षरावरून नाव गाव फुल फळ,बिंदू जोडणे,मोकळ्या वेळात आम्ही असले खेळ खेळायचो,कंपास ने बाकांवरती नाव कोरायचे,बाकाला कान लावायचे आणि वरती बाकाच ढोलकी बनवायची,पाठीवरती अक्षर किंवा नाव लिहायचं आणि ज्याच्या पाठीवर लिहले त्याने ते ओळखायचं,दमशेराज,आणि एकदमच जास्त कंटाळा आला की मग वहीचे शेवटचे पान काहीही रेखोट्या काढायच्या..कितीतरी अगण्य आठवणी आहेत..
"जितकं आठवेल तितका कमीच आहे,पण हृदय भरून येणारे"
Vrey nice dear purane din yaad aa gaye..
ReplyDeleteNice one.... school is the best phase of life for everyone and you portrayed it very well
ReplyDeleteThank you🙏
DeleteBeautiful....
ReplyDelete