तिसरा
नाते कोणतेही असो त्यावर जरासुद्धा संशयाची चिंगारी पडली तरी आग खूप वेगाने लागते।
ही गोष्ट एका कुटुंबाची आहे,सर्व आपल्या आयुष्यात खूप खुश होते.राधा नावाची मुलगी ,तिची आई सावत्र होती पण सख्या आईसारखंच जपत होती.
लहानपणी तिच्या सख्या आईचा अपघातात मृत्यू झाला,वडिलांनी दुसरे लग्न केले,सावत्र आईला जुळी मुले झाली,तरीही ती राधा वर जीव ओवाळून टाकायची.
राधाची सावत्र आई दिसायला खूप सुंदर,एकदा तिच्या वडिलांचा एक मित्र त्यांच्या घरी आलेला,राधा च्या आईला पाहून तो इथे तिथे स्पर्श करू लागला,सर्व मुले शाळेत गेलेली होती,तितक्यात राधाचे वडील अनिलराव तिथे येतात..राधाची सावत्र आई त्या माणसाला कानाखाली मारणार तर त्या माणसाने तिचा हाथ धरला आणि राधाच्या वडिलांनी पाहिला,राधाच्या वडिलांना राग अनावर झाला आणि राधाच्या आईला सनकन कानाखाली ओढली,राधाची आई भिंतीला लागून पडली।तितक्यात तो मित्र म्हणाला ,अशी कशी रे तुझी बायको,सर्व घरात आहे तरी काय कमी पडत होते जे मला फसवायला निघाली होती..
तेवढ्यात राधा आणि तिचे दोन्ही भावंड शाळेतून घरी येतात,आईला पडलेलं पाहून राधा आणि चिनू,मिनू पळत आईकडे धाव घेतात तेवढ्यात अनिलराव राधाच्या आईच्या साडीने राधा चा गळा आवळतात,राधा स्वतःला वाचवण्यासाठी हाथ गळ्यासमोर आणते पण गळा दबतो आणि राधा बेशुद्धध होते.
अनिलरावना वाटते राधा मेली म्हणून ते हातातली साडी सोडून चिनू चा गळा दाबून त्याचा सुद्धा जीव घेतात,नंतर मिनूचा सुद्धा सारख्याच प्रकारे मारून टाकतात.
अनिलराव राधाच्या आई समोर बसतात आणि म्हणतात,तुला मी काय कमी केलं होतं जे तू अस केलेस,आतापर्यंत त्या माणसाने माझ्या कामाच्या ठिकाणी बोंबाबोंब केलीही असेल,हे सर्व बघण्यापेक्षा मेलेलं बरे,बदनामी झाली रे बदनामी..
अनिलरावाना वाटले सर्व मेले आहेत म्हणून त्यांनी स्वतःला सुद्धा गळफास लावून घेतला..
आजूबाजूचे शेजारी आवाज ऐकून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होते पण उशीर झालेला दरवाजा त्यांनी तोडला घरात शिरले तर पाहिला की राधाची सावत्र आईला डोक्याला मार लागला होता पण ती जिवंत होती, आणि राधा फक्त बेहोश झालेली होती.
चिनू,मिनू आणि अनिलराव हे जग सोडून गेले होते.लगेच पोलिस आले राधा व तिच्या आईला हॉस्पिटलमध्ये दाखल केले..दोघींना होश आला तेव्हा घडलेलं प्रकरण समजले..
तिघांचा अंतिम संस्कार करून राधा आणि तिची आई खंबीरपणे पुढच्या वाटचाली साठी सुरुवात केली..
राधा आणि तिच्या आई च नाते सावत्र असले तरी त्या नात्याची किंमत दोघींना होती.
एका तिसऱ्या माणसाच्या खोटारडेपणामुळे आणि अनिलरावाच्या गैरसमजामुळे हे कुटुंब बरबाद झाले,संशय प्रत्येकाच्या मनात येतो पण जे संकट परस्पर बोलून सोडवता येते ते आपण सहज टाळू शकतो।
अप्रतिम कोमल 👌🏻👌🏻
ReplyDeleteThanks 🙏
Delete